सतांची वाणी

हे तो टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ।।१।। बरे नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.।। मुरगाळिला कान । समांडिलें समाधान ।।२।। धन्य ह्मणे आतां । येथे नुधवा माथ।।३।। अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखू नका ||४|| - संत. तुकाराम महाराज