युगायुगांचा दीप. उजळून गेले नभी नक्षत्र

युगायुगांचा दीप. उजळून गेले नभी नक्षत्र प्रकाश पडला हो शिवतेजाचा युगायुगांचा दीप हा शिवराया. मातीमधुनी चैतन्य उगवले पेटविले रान दशदिशात मावळ्यांनी यवन दुर्जना केला शिवप्रहार. सांडुनी रक्त बांधिले तोरण तलवार हाती वाढविले स्वराज्य रयतेला लाभले सुखी शिवछत्र. दूर्जन अन्यायी यवन मारीला शेतकरी कष्टकरी अवघाचि तारीला प्रजाहित कल्याणकारी ही शिवनीती. धार लागली तलवारीच्या पात्याला ओवी फुलली घराघरात जात्याला गरजच दिशात फडकला भगवा. नतमस्तक झाला सह्याद्रीचा कडा दरीखोर्यातून निनांदला विजयी चौघडा प्रकाश पडला हो शवतेजाचा उजळून गेले नभी नक्षत्र युगायुगांचा दीप हा शिवराया. राहूल हरिभाऊ इंगळे पाटील ---- मो.९८९०५७७१२८