आरोग्य संकलित जाणिवेत बदल करणारी कारणे शुद्धीवर परिणाम झाल्यास जाणिवेची कार्यक्षमता कमी होते. आकलता (कन्फ्यजन) हे लक्षण शुद्धीवर हलक्या प्रतीचा परिणाम झाला तर किंवा भावनिक क्षोभ झाल्यास तसेच विचारांच्या गर्दीमुळेही होऊ शकते. त्यामुळे वातावरणाशी बिनचूक संपर्क ठेवणे कठीण होते व व्यक्ती । गोंधळून जाते. याहीपेक्षा तीव्र लक्षण म्हणजे तंद्रावस्था (स्ट्रपर). यात व्यक्तीचा वातावरणाशी संपर्क केवळ निमित्तमात्र असतो आणि धोक्याचीसुद्धा जाणीव रहात नाही. हे लक्षण ऐंद्रिय तसेच __तात्र प्रकारच्या काायक चित्तावकृतात सापडत. उदा., गालतगात्रा छिन्नमानस. अवधानाच्या बिघाडाचे एक प्रमुख लक्षण म्हणजे व्यग्रतावस्था (डिस्ट्रॅक्टेबिलिटी). यामुळे चित्त कठाण हात. द्रिय विकाराचे हे प्राथमिक लक्षण असून तक लक्षण असून तीव्र विकारात अवधान दोलायमान (फ्लक्चुएटिंग) राहते. पुढे जाणिवेचीही हीच अवस्था होते. तीव्र चिंतेमुळेही अवधान क्षीण होते. दिशाबोधनक्षमता व्यक्तीला वेळ, स्थळ व व्यक्तिओळख याची स्पष्ट कल्पना देते. ऐंद्रिय विकारात तसेच तीव्र प्रकारच्या चित्तविकृतींत ही क्षमता बरीच क्षीण होते. निद्रानाश हे सर्वांत प्रचलित असे लक्षण असून जवळजवळ सर्व मानसिक विकारांत ते सापडते. भाववृत्तीय चित्तविकृतीत लवकर जाग येते; तर मज्जाविकृतीत उशिरा येते. तीव्रउद्दीपन व छिन्नमानसी चित्तविकृतींत निद्रानाश - रात्रभर होऊ शकतो. काही ऐंद्रिय र विकारांत निद्राकाळात व्युत्क्रम होतो म्हणजे दिवसा झोप व रात्री निद्रानास. (२) भावनिक लक्षणे भावनिक यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार : भावनेची विसंगती व अयोग्यता तसेच भावनेचे दारिद्य किंवा पर्ण अभाव (पथी) हे छिन्नमानसी चित्तविकृतीचे विशिष्ट विकृतिसूचक (पॅथोग्नोमॉनिक) लक्षण आहे. भावनेचा अतिरेक व वर्चस्व हे भाववृत्तीय विकारांचे मुख्य लक्षण होय. उदा., उद्दीपन विकृतीत मदांधता (इलेशन) म्हणजे हर्ष, गर्व व फाजील आत्मविश्वास हे मुख्य लक्षण आणि अवसाद चित्तविकृतीत त्याउलट खिन्नता आणि खजीलपणा. भावनांची सहजता व परिवर्त्यता (लॅबिलिटी) : ऐंद्रिय विकारांतील बुद्धिभ्रंश हे ह्या विकारांचे सूचक लक्षण आहे. ह्याच विकारसमहाचे लक्षण 'सखभ्रम' (यूफोरिया). यात शारीरिक क्लेश असतानासुद्धा रुग्ण खुशीत दिसतो. काही विशिष्ट भावना : विशिष्ट विकृती सूचक असतात. उदा., भयगंडातील अवास्तव भीती; निवर्तनी अवसादातील (इन्व्होलूशनल डिप्रेशन) क्षोभण (जिटेशन); अवसादी चित्तविकृतीत आणि निर्व्यक्तीकरण (डीपर्सनलायझेशन) मज्जाविकृतीत भावना मेल्याची खंत तसेच भोवतालचे वातावरणच बदलल्याची भावना (डीरियलायझेशन). (३) विचारयंत्रणेची लक्षणे रूपान्त (फॉर्म) विकती । अवास्तवीकरणामुळे (डीरीइझम) विचारांचा आणि अनुभवाचा तसेच तर्कशुद्धतेचा संपर्क तुटतो. इच्छावर्ती वितारक्रियेत स्वेच्छेप्रमाणे निष्कर्ष काढले जातात. दोन्ही लक्षणे छिन्नमानसाची विकृतीसूचक लक्षणे आहेत.
मानसिक कारक.... आरोग्य